बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य भारतीय जनता पक्षाने बेळगाव शहर, ग्रामीण आणि चिक्कोडी जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांच्या आपल्या नूतन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे.
भाजपने राज्यातील आपल्या नूतन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली असून त्यानुसार बेळगाव शहर अध्यक्षपदी गीता सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच बेळगाव ग्रामीण अध्यक्षपदी सुभाष पाटील यांची नियुक्ती झाली असून चिक्कोडी जिल्हा अध्यक्षपदी सतीश आप्पाजीगोळ यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भाजप राज्याध्यक्ष विजयेंद्र यांनी सदर नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. आपल्या या आदेशाद्वारे विजयेंद्र यांनी राज्यातील एकूण 39 नूतन जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.