बेळगाव लाईव्ह :भारतीय रेल्वे खात्यातर्फे येत्या फेब्रुवारी महिन्यात बेळगाव -अयोध्या -बेळगाव अशी एक फेरी करणारी स्पेशल एक्सप्रेस रेल्वे सेवा उपलब्ध केली जाणार आहे.
बेळगाव ते अयोध्या स्पेशल एक्सप्रेस रेल्वे येत्या 17 फेब्रुवारी रोजी बेळगावहून प्रस्थान करेल आणि अयोध्येतून पुन्हा परतीच्या प्रवासाला 20 फेब्रुवारी रोजी प्रारंभ करेल.
सदर रेल्वे 48 तासात सिकंदराबाद मार्गे अयोध्येला पोहचणार आहे. या रेल्वेला 20 जीएससीएन, 02 एसएलआरडी -22 आयसीएफ कोचीस असतील. बेळगाव ते अयोध्या स्पेशल एक्सप्रेस रेल्वे शनिवार दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:35 वाजता बेळगावहून प्रयाण करून सोमवारी सकाळी 10:35 वाजता अयोध्येत पोहोचेल.
त्याचप्रमाणे अयोध्येतून मंगळवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:55 वाजता सुटून या स्पेशल एक्सप्रेस रेल्वेचे बेळगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी दुपारी 4:45 वाजता आगमन होईल.