Sunday, December 22, 2024

/

युवा निधीसाठी बेळगावातून इतके अर्ज

 belgaum

बेळगाव लाईव्ह :काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांपैकी युवा निधी योजनेसाठी बुधवारपर्यंत २६,६२६ अर्ज दाखल झाले आहेत. या यादीत बेळगाव जिल्हा २,९२१ अर्जासह अव्वल आहे. त्यानंतर बंगळूर शहर (२,२८२) आणि बागलकोट जिल्हा (१,४४२) आहे. सरकारी आकडेवारीनुसार या तीन जिल्ह्यांव्यतिरिक्त, रायचूर, विजापूर, तुमकूर, शिमोगा आणि धारवाड जिल्ह्यातून युवा निधीसाठी प्रत्येकी १,००० हून अधिक अर्ज आले आहेत.

बेरोजगार पदवीधर आणि पदविकाधारकांसाठी (डिप्लोमाधारक) ही योजना आहे. या योजनेद्वारे दोन वर्षांसाठी अनुक्रमे ३,००० रुपये आणि १,५०० रुपये प्रति महिना देण्यात येणार आहेत. सरकारने युवा निधीसाठी २६ डिसेंबरपासून अर्ज घेण्यास प्रारंभ केला आहे.दि. १२ रोजी शिमोगा येथील कार्यक्रमात या योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे.कोडगूमध्ये सर्वात कमी ६४ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर चामराजनगर (१०६) आणि उडुपी जिल्हा (११६) आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या म्हैसूर जिल्हयातून ४४८ अर्ज तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या रामनगर जिल्ह्यातून केवळ २०७ अर्ज दाखल झाले आहेत.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले एकूण ५.२९ लाख पदवीधर आणि पदविकाधारक युवा निधीसाठी पात्र आहेत. बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी ते पदवीनंतर १८० दिवस बेरोजगार असले पाहिजे.

सरकारी किंवा खासगी नोकर, स्वयंरोजगार करणारे, उच्च शिक्षण घेत असलेले आणि कर्नाटकातील अनिवासी युवा निधीसाठी अपात्र आहेत. लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपूर्वी त्यांची नोकरीची स्थिती जाहीर करावी लागेल.Yuva nidhi

टॉप आठ जिल्हे

बेळगाव : २,९२१
बंगळूर शहर २,२८२
बागलकोट : १,४४२
रायचूर : १,३६१
विजापूर : १,२५१
तुमकूर : १,०८७
शिमोगा : १,०३६
धारवाड : १,००८

या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात सुमारे २५० कोटी रुपये, २०२४-२५ मध्ये १,२५० कोटी रुपये आणि २०२५-२६ मध्ये २,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.