बेळगाव लाईव्ह:मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुबळी येथील एका कार्यक्रमात मुस्लिम धर्मियांना दहा हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे असे वक्तव्य करून सभागृहाचे पावित्र भंग केले आहे, असा आरोप करत विरोधी भाजप आमदारांनी सभागृहात एकच गोंधळ घातला. सत्ताधारी पक्षाकडूनही त्यांना जोरदार उत्तर देण्यात आले. अखेर विरोधी आमदारांनी सभात्याग करून निषेध नोंदविला.
विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळच्या सत्रात प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर भाजप आमदार सुनील कुमार यांनी लक्षवेधी मांडली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुबळी येथे मुस्लिम धर्मीयांच्या कार्यक्रमात बोलताना आपण त्यांना दहा हजार कोटी रुपयांचे अनुदान देणार आहोत असे सांगितले आहे. विधिमंडळ सभागृह सुरू असताना अशा प्रकारची घोषणा करणे हे सभागृहाचे पावित्र्य भंग करण्यासारखे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर माफी मागून स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
कायदामंत्री एच के पाटील यांनी हा मुद्दा खोडून काढत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत मीही त्या कार्यक्रमाला होतो. मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना दहा हजार कोटी देतो असे सांगितले आहे पण ते आत्ता आपण चार ते पाच हजार कोटी रुपये मुस्लिम बांधवांना देत आहोत. यापुढे टप्प्याटप्प्याने दहा हजार कोटी रुपये अनुदान देऊ, असे सांगितले आहे. ही घोषणा केल्याने सभागृहाचे पवित्र नष्ट होत नाही. विरोधी पक्ष चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप केला.
मंत्र्यांच्या या स्पष्टीकरणाला विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी आक्षेप घेतला. सरकारला राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दोन ते तीन हजार कोटी रुपये मिळत नाहीत. पण आपले वोट बँक सांभाळण्यासाठी दहा हजार कोटी रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात येते. हे अत्यंत चुकीचे आहे, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना विसरू नका, अन्यथा शेतकरी तुमच्या सरकार पाडवतील असेही ते म्हणाले.
विरोधी आमदारांच्या आरोपांना मंत्री एच के पाटील आणि आर. व्ही. देशपांडे यांनी विरोधी पक्ष खोटे बोलत आहेत. कुठे पसरवून आपली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षाकडूनच सभागृहाचे पावित्र्य धोक्यात आले आहे असा आरोप केला.
दोन्हीकडून जोरदार आरोप झाल्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर विरोधी भाजपच्या आमदारांनी सभात्याग करून या घटनेचा निषेध नोंदविला. निजदचे आमदार मात्र सभागृहात बसून होते.