बेळगाव लाईव्ह :विधिमंडळ अधिवेशनात वैयक्तिक प्रश्न उपस्थित करून स्वतःचा वाढवून घेण्यापेक्षा राज्याचा कसा विकास होईल, यावर चर्चा करा, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष यू. टी. कादर यांनी विरोधक व सत्ताधारी आमदारांचे कान टोचले.
विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सकाळचे सत्र सुरू होताच. विरोधी पक्षातून सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री उपस्थित राहत नाहीत, असा आरोप करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
त्यावर संतप्त झालेल्या विधानसभा अध्यक्ष यू. टी. कादर यांनी, उत्तर कर्नाटक विकास, दुष्काळ निवारण या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे आवश्यक आहे.
पण आमदारांकडून वैयक्तिक टी आर पी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे. वैयक्तिक टीआरपी पेक्षा राज्याच्या विकासावर चर्चा करा. विनाकारण वेळ वाया घालवू नका, सभागृहाच्या वेळेस खूप महत्त्वाचा असतो, अशा शब्दात कानपिचक्या दिल्या.