बेळगाव लाईव्ह :एपीएमसीमधील होलसेल भाजी मार्केट बंद झाल्याने गांधीनगरमधील जय किसान भाजी मार्केटमध्ये शेतकरी, व्यापारी व दलालांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे, मंगळवारपासून (२ जानेवारी पासून) भाजी मार्केट सकाळी व सायंकाळी असे दोन सत्रांत भरविण्याचा निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
रहदारीची कोंडी होत आहे. परराज्यात जाणारी भाजीपाल्याची वाहने अडकून पडत आहे. तसेच एपीएमसीमधील व्यापारीही जय किसानमध्येच दाखल झाल्याने गर्दी वाढली आहे.
त्यासाठी भाजी मार्केट दोन टप्प्यात भरविल्यास शेतकरी, व्यापारी व वाहनचालकांच्या सोयीचे होईल असे मत काहीजणांनी बैठकीत मांडले. त्याला काहींनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. मात्र, त्यावर तोडगाव काढून २ जानेवारीपासून मार्केट दोन सत्रांत भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
दलाल सकाळच्या सत्रातच येऊ लागल्याने काही दिवसातच हा प्रयोग बंद पडला. तेव्हापासून मार्केट
सकाळच्या सत्रातच भरत आहे. मात्र, त्यामुळे, काही अडचणीही निर्माण झाल्या आहेत.
सकाळच्या वेळी भाजीपाल्याची आवक व जावक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे, याठिकाणी
रहदारीची कोंडी होत आहे. परराज्यात जाणारी भाजीपाल्याची वाहने अडकून पडत आहे. तसेच एपीएमसीमधील व्यापारीही जय किसानमध्येच दाखल झाल्याने गर्दी वाढली आहे.
त्यासाठी भाजी मार्केट दोन टप्प्यात भरविल्यास शेतकरी, व्यापारी व वाहनचालकांच्या सोयीचे होईल असे मत काहीजणांनी बैठकीत मांडले. त्याला काहींनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. मात्र, त्यावर तोडगाव काढून २ जानेवारीपासून मार्केट दोन सत्रांत भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
जय गाळेवाटपावरुन किसानमधील व्यापाऱ्यांमध्ये आधीपासूनच धुसफूस सुरु आहे.आता एपीएमसीतील व्यापारीही याठिकाणी दाखल झाले आहे. मध्यंतरी या व्यापाऱ्यांना जय किसान मध्ये व्यापार करण्यास मज्जाव केला होता. त्यावर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. मात्र, अंतर्गत धुसफूस कायम आहे.
66 शेतकरी व व्यापाऱ्यांची मते आजमावून भाजी
मार्केट दोन सत्रांत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार मंगळवारपासून मार्केट
सकाळी ६ ते १० व दुपारी १ ते ६ या
वेळेत भरविण्यात येईल. सर्वांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे अशी माहिती जय किसान संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.