बेळगाव लाईव्ह :देशाला स्वातंत्र्य मिळताच मुचंडीत सुरू झालेल्या सरकारी मराठी शाळेचे योगदान मोठे आहे. या शाळेत शिकलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवला आहे.
एकाच ठिकाणी मराठी व कन्नड शाळा असणे ही विशेष बाब आहे. या शाळेच्या प्रगतीत एसडीएमसी सदस्य आणि ग्रामस्थांचेही योगदान निर्णायक ठरले आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
मुचंडी येथे सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विभागीय कार्यकारी अभियंता संजीवकुमार हुलकाई आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीत सादर केले.
मंत्री जारकीहोळी म्हणाले, येथील शिक्षक दर्जेदार शिक्षण देत असून विद्यार्थ्यांची चांगली जडणघडण होत आहे. शाळेच्या देखभाल आणि संगोपनात सर्वच हुलकाई व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रार्थनागीत सादर केले. अर्जुन चौगुले यांनी स्वागत केले.
राजकीय नेत्यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत योगदान दिले आहे. १५ वर्षांच्या कार्यकाळात मी शाळेच्या विकासासाठी सर्व प्रकारची मदत केली आहे.
यापुढील काळातही सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, शाळेतील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नंतर मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.