बेळगाव लाईव्ह :प्रचंड उत्सुकता लागून राहिलेली सांबरा येथील श्री महालक्ष्मी यात्रा पुढील वर्षी मे महिन्यात होणार आहे. गावाकऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी उपरोक्त निर्णय घेण्यात आला.
मंगळवार दि 14 मे 2024 रोजी यात्रेला सुरुवात होणार आहे. पहिले चार दिवस रथोत्सवासह नऊ दिवस यात्रा होणार आहे. दि 22 मे 2024 रोजी यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रेनिमित्त यापूर्वीच गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम झाला असून रेडा व पालवा सोडण्याचा विधी पार पडला होता. तब्बल 18 वर्षानंतर गावाची यात्रा होणार आहे. यात्रेसाठी 70 फूट उंचीचा रथ बनविण्यात येणार आहे.
रथ उभारण्याचे काम यापूर्वीच सुरु झाले आहे. दि. 29 जानेवारी 2024 गावातील भाविक सौदंतीला यात्रेसाठी जाणार आहेत.
तर दि 13 फेब्रुवारी महालक्ष्मी देवीच्या रंगकामाला सुरुवात होणार आहे. बैठकीला यात्रा कमिटी, देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.