लालबेळगाव लाईव्ह : बेळगावहून गोव्याला ये जा करताना चोर्ला घाटात आता रहदारी जामची समस्या आता कमी होणार आहे कारण गोव्यात सांखळी-चोर्ला-बेळगाव नवीन समांतर रस्त्याची योजना बनवण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या आढावा बैठकीनंतर सांखळी-चोर्ला-बेळगाव हा नवीन समांतर रस्ता बांधण्याची घोषणा केली आहे.
गोवा राज्याने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडे बेळगाव ते खानापूरमार्गे साखळीला जोडण्यासाठी समांतर रस्ता बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चोर्ला मार्गे या रस्त्याच्या बांधकामासाठी राज्याला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याची विनंती केली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. सी एम यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी पोर्टफोलिओ) देखील आहे.
या रस्त्यावर वाहतूक वाढल्याने साखळी ते बेळगाव रस्ता रुंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. सावंत म्हणाले की, चौपदरी रस्त्याचा विस्तार करण्याऐवजी समांतर रस्ता तयार केल्याने पर्यावरणाचे रक्षण होईल. पुढे म्हणाले.“आम्हाला वन खात्याची मंजुरी मिळाल्यास काम सुरू होईल,”
केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग आणि सावंत यांच्यासह गडकरी यांनी सध्या सुरू असलेल्या महामार्ग प्रकल्पांबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतला. अनमोड ते साखर कारखाना ते खानापुर या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार असून, कर्नाटकचा रस्ताही पूर्ण होणार असल्याचे सावंत यांनी नमूद केले.