Wednesday, November 27, 2024

/

पृथ्वी सिंह जवळकर प्रकरणाचे विधानसभेत पडसाद

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भाजप पदाधिकारी पृथ्वी सिंह आणि नगरसेवक अभिजीत जवळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी गुरुवारी विरोधी पक्ष भाजपने विधानसभेत पुन्हा वादंग केला.

पृथ्वी सिंह यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयीतावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि अभिजीत जवळकर यांना अटक करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करावे अशी मागणी भाजपकडून करण्यात आली पण राज्याचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी या दोन्ही प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे चौकशीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

विधानसभेच्या दुसऱ्या सत्रात गुरुवारी भाजपकडून भाजप पदाधिकारी पृथ्वी सिंह यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह इतर संशयतांवर 307 अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली विरोधी पक्ष नेते आर अशोक यांच्यासह सुनील कुमार बसन गौडा यतनाळ पाटील सुरेश कुमार आदींनी ही मागणी उचलून धरली.Singh javalkar

त्यावर उत्तर देताना गृहमंत्री डॉ परमेश्वर यांनी फिर्यादीने जी तक्रार पोलीस स्थानकात नोंदविली आहे त्याच आधारावर एफ आय आर करण्यात आली आहे त्यानुसार संशयाचा विरोधात कलमे लावण्यात आले आहेत. त्यामुळे या विषयाचा बाऊ न करता पोलीस चौकशी होईपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे आम्ही निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करणार आहोत असे सांगितले.

भाजपच्या एका आमदाराने नगरसेवक अभिजीत जवळकर यांना झालेली मारहाण आणि त्यांना रुग्णालयात असताना झालेले अटक या प्रकरणावर पुन्हा आवाज उठवला.Krishna

त्यावर गृहमंत्री परमेश्वर यांनी या प्रकरणाची सुद्धा पोलीस चौकशी सुरू आहे चौकशीमध्ये सत्य बाहेर येईल त्यामुळे त्यानंतरच यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. भाजपच्या उत्तरावर समाधान न झाल्याने सभा त्याग करून सरकारचा निषेध नोंदवला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.