बेळगाव लाईव्ह :खाऊ कट्ट्याची बंगळूरमधून चौकशी सुरु आहे. महापालिकेकडून का सहकार्य करण्यात येत नाही, असा सवाल करत खाऊ कट्ट्यातील व्यापार परवाना नसलेल्या दुकानांवर कारवाई करावी, अशा सूचना आमदार राजू सेठ यांनी केल्या आहेत.
नुकताच बेळगावमहापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी, खाऊ कट्ट्याच्या चौकशीबाबत विचारणा केली. खाऊ कट्ट्याची चौकशी बंगळूरमधून सुरु झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने महापालिकेकडूनही अहवाल पाठवला आहे. पण, महापालिकेकडून सहकार्य करण्यात येत नाही. सध्या तेथील ३०दुकानांना व्यापार परवाने नसल्याचेही समोर आले आहे. त्यांच्यावर अद्याप का कारवाई करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी लवकरात लवकर ही कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना दिल्या.
बेळगावात झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत बेळगाव विमान तळाच्या चर्चेत सहभागी होताना आमदार सेठ यांनी खोचक प्रश्न उपस्थित केला होता पहिल्यांदा आमदार झालेले सेठ यांनी विधान सभेतील सभागृहात जोरदार बॅटिंग केली होती आता मनपात देखील कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरून मनपा यंत्रणेला शिस्त लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.त्यांचे मोठे बंधू यांनी दोन वेळा आमदारकी भोगली तरी त्यांना सभागृहात छाप पाडण्यासाठी अवधी लागला होता मात्र राजू सेठ यांनी केवळ सहा महिन्यातच जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे.
शहरात पे अॅण्ड यूज स्वच्छतागृहांची गरज आहे. आवश्यक त्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत. सांडपाणी वाहिनी खराब झाल्यामुळे दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांना सांगूनही वेळेत काम होत नाही.शहरात पे अॅण्ड यूज स्वच्छतागृहांची गरज आहे.
आवश्यक त्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत. सांडपाणी वाहिनी खराब झाल्यामुळे दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांना सांगूनही वेळेत काम होत नाही. कामातसुधारणा करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आमदार सेठ यांनी दिला.बैठकीला अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.