बेळगाव लाईव्ह: कर्नाटक सरकारच्या बेळगावांतील हिवाळी अधिवेशना विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीला बेळगावात
महामेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारल्याने एकीकरण समितीच्या वतीने 4 डिसेंबर रोजी शिनोळी येथे महाराष्ट्राच्या हद्दीत रास्ता रोको केला होता त्या रोकोत बेळगावात मराठी भाषिक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहे.
बुधवार दिनांक 6 रोजी शहर महाराष्ट्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर मुक्कामी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन सदर गुन्हे मागे घ्या अशी विनंती केली असता पोलीस अधीक्षकानी कायद्याच्या चौकटीत बसवून सदर गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन दिले.
शिवसेनेचे विजय देवणेसह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना भेटलेल्या शिष्टमंडळात शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, बेळगाव जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष शंकर बाबली महाराज, माजी नगरसेवक अनिल पाटील जनसंपर्कप्रमुख विकास कलगटगी युवा कार्यकर्ते सागर पाटील कपिल भोसले आदी उपस्थित होते.
सोमवारी 4 रोजी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर समिती व शिवसेनेकडून रास्ता रोको करण्यात आलेला होता यावेळी महाराष्ट्र सरकार विरुद्ध घोषणा ही दिल्या गेल्या होत्या बेळगावात मात्र कर्नाटक पोलीस गुन्हे दाखल करण्याची मालिका चालू असतानाच आता महाराष्ट्र पोलीसात ही गुन्हे दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी गु.रं.नं.कलम:-434 /2023 भा.द.वि.स. कलम,341,143,147,188 महा. पोलीस अधि. 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
शिवसेना नेते विजय देवणे, रा. कोल्हापुर 2) प्रभाकर खांडेकर रा शिनोळी खुर्द ता. चंदगड 3) विक्रम मुतकेकर रा. विनायक नगर चंदगड 4) दिनकर पावसे 5) आर.एम. चौगुले, 6) चंद्रकांत कोंडुसकर, 7) रमाकांत कोंडुसकर, 8) श्रीपाद आप्टेकर, 9) शुभम शेळके 10) लक्ष्मण मनवाडकर, 11) दिगंबर पाटील 12) नेताजी जाधव 12) गोपाळ देसाई, 14) मालोजीराव माने, 15) प्रकाश मरगाळे 16) सरीता पाटील, 17) निखील देसाई 18) प्रकाश आष्टेकर, 19) मुरलीधर पाटील, 20) मनोहर किणेकर आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.