Saturday, December 21, 2024

/

कॅपिटल वन व्याख्यानमालेची सुरूवात*

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगांव येथील कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या एस.एस.एल.सी व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती महाविद्यालयाचे निवृत प्राचार्य आर के.पाटील, संस्थेचे व्हा. चेअरमन शाम सुतार , मराठी विषयाचे व्याख्याते ठळकवाडी हायस्कूलचे .सी वाय.पाटील.आणि मराठी विद्यानिकेतन हायस्कूलचे  बी एम.पाटील.सर उपस्थित होते.

व्याख्यानमालेची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दिपप्रज्वलन करून करण्यात आले.

संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यांनी व विद्यार्थी वर्गाला उद्देशून आपल्या भावी आयुष्याची सुरुवात म्हणून या दहावीच्या परिक्षेला निर्भिडपणे सामोरे जाऊन नवीन जगात नवे धेय उराशी बाळगून पुढे वाटचाल करावी.असे मत व्यक्त केले.आर .के .पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात मातृभाषेचा न्यूनगंड न बाळगता निर्भिडपणे परीक्षेस सामोरे जावे.अशा संदेश दिला.Capital one

यावेळी मागील वर्षीच्या शिबिरामधील 99.2% गुण प्राप्त केलेल्या विध्यार्थिनी रोशनी कित्तुरकर हिंने आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आपल्या यशाचे श्रेय व्याख्यानमालेस दिले.

सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक  रामकुमार जोशी , सदानंद पाटील, शिवाजीराव अतिवाडकर,शरद पाटील लक्ष्मीकांत जाधव संजय चौगुले नकर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मराठी विषयाच्या व्याख्यानाची सुरुवात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.