बेळगाव लाईव्ह :बेळगावहून अयोध्या पंढरपूर आणि शबरीमलाई या धार्मिक स्थळांना रेल्वे सेवा सुरू करा अशी मागणी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी केली आहे.
बुधवारी दिल्ली मुक्कामी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सदर मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मंगला अंगडी यांनी मंत्र्यांकडे विनंती करत बेळगाव लोकसभेच्या कार्यक्षेत्राशी संबंधित रेल्वे विभागाच्या विविध विकास समस्यांवर चर्चा केली.
बेळगाव कित्तूर धारवाड नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले असून ते जलद गतीने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याची विनंती केली. याशिवाय बेळगाव शहरातील टिळकवाडी तिसरा गेट लेव्हल क्रॉसिंग 381 जवळ बांधण्यात येणाऱ्या रोड ओव्हरपासच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अनेक महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे शहरातील सुरळीत वाहतूक विस्कळीत झाली आहे, ते पुन्हा सुरू करून पूर्ण करण्याची विनंती त्यांनी केली.
बेळगाव शहरातील रेल्वे मंत्रालयाने लेव्हल क्रॉसिंग 382 आणि 383 जवळ रस्ता ओव्हरपास बांधण्यास देखील मान्यता दिली आहे त्याचे काम सुरू करावे.
तसेच येत्या काही दिवसांत बेळगाव रेल्वे स्थानकावरून बेळगाव शहरापासून अयोध्येपर्यंत श्री राम मंदिर तीर्थक्षेत्राला दर्शन घेण्यासाठी आणि श्री विठ्ठला रुखमाई मंदिर दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी पंढरपूर बेळगाव आणि श्री सबरी मलई तीर्थक्षेत्र या दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करा बेळगाव-कोची आणि बेळगाव पुणे या रेल्वे सेवा सुरू करून बेळगाव लोकसभा मतदार संघातील जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणीही केली
या शिवाय बेळगाव टपाल विभागाच्या संदर्भात, 5000 चौरस फूट जागेवर स्वतःची इमारत बांधण्यासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करून द्यावे असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.