बेळगाव लाईव्ह :कृष्णा स्पिच थेरपी सेंटर आणि हिअरींग क्लिनीक तर्फे बहिरेपणा व ऐकु कमी येणाऱ्यांसाठी मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
कृष्णा स्पीच थेरपी आणि हिअरींग क्लिनीक यांच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त कान (श्रवण), वाचा (स्पीच) यावर बेळगांव, गोकाक व चिक्कोडी या शहरांमध्ये मोफत तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे.या शिबीरामध्ये ऑडिओलॉजी विभागामार्फत ऐकु न येणाऱ्या समस्ये सबंधीत कानाच्या सर्व तपासण्या अत्याधुनीक मशीनरीजच्या सहाय्याने करण्यात येणार आहेत.
या तपासणीमध्ये ज्या रुग्नांणा ऐकण्यासंबंधी अतितीव्र श्रवणदोष आढळुन येईल, अश्या रुग्नांणा नामांकीत कंपनीचे श्रवण यंत्र कमीतकमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये कानाच्या आतिल अदृश्य CIC, IIC व कानाच्या मागील RIC, BTE तसेच रिचार्जेबल श्रवण यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती ऑडीओलॉजिस्ट स्पिच थेरेपिस्ट राजेभाऊ राठोड यांनी दिली.
सदर शिबिराबद्दल बेळगाव लाईव्हला अधिक माहिती देताना कृष्णा स्पीच अँड हेरिंग क्लिनिकचे ऑर्डीओलॉजिस्ट स्पीच थेरपीस्ट डाॅ. राजीभाई राठोड म्हणाले की, कृष्णा स्पीच अँड हेरिंग क्लिनिकच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त 8, 9 आणि 10 डिसेंबर रोजी मोफत श्रवण व वाचा दोष चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. ज्यांना ऐकण्यामध्ये अथवा बोलण्यामध्ये समस्या आहे ते लोक या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. संबंधित लोकांमध्ये ऐकण्या व बोलण्याचा किती दोष आहे हे या शिबिरात आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या यंत्राद्वारे तपासले जाईल. तपासणीनंतर ज्यांच्यात ऐकण्यामध्ये जास्तीत जास्त दोष आहे त्यांना श्रवण यंत्र माफक दरात उपलब्ध करून दिली जातील. त्याचप्रमाणे ज्यांना बोलण्यासंबंधीच्या कांही समस्या आहेत. त्यांना तज्ञ स्पीच थेरपीस्टच्या माध्यमातून त्यादिवशी मोफत स्पीच थेरपी देण्यात येईल. त्यानंतर संबंधितांना स्पीच थेरपी पुढे आणखी आत्मसात करावयाची असल्यास त्यांना ठराविक शुल्कामध्ये स्पीच थेरपीचे पुढील प्रशिक्षण दिले जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे श्रवणदोषासाठी वापरण्यात येणारी कानांतर्गत व बाह्य रिचार्जेबल श्रवण यंत्रे आम्ही या शिबिरामध्ये कमीत कमी दरात उपलब्ध करून देत आहोत. सदर मोफत श्रवण व वाचा दोष चिकित्सा शिबिर 8, 9 व 10 डिसेंबर रोजी गोकाक, बेळगाव आणि चिकोडी येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित केले जाईल. तरी या शिबिराचा श्रवण व वाचा दोष असणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. शिबिरा बाबत आपल्या गावात तसेच आप्तस्वकियांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले.
कृष्णा स्पीच अँड हेरिंग क्लिनिकच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये शाखा आहेत. उत्तर कर्नाटकाचा विचार केल्यास बेळगावसह हुबळी, गोकाक, चिक्कोडी, मुधोळ, बागलकोट, विजापूर या ठिकाणी आमचे क्लिनिक कार्यरत आहे. यापूर्वी श्रवणदोष अथवा वाचा दोष असेल तर त्यावरील उपचारासाठी थेट बेंगलोरपर्यंत जावे लागत होते. मात्र आमचे क्लिनिक सुरू झाल्यापासून संबंधित दोषग्रस्त लोकांची चांगली सोय झाली आहे. त्यांचा वेळेचा अपव्यय टळण्याबरोबरच मोठी आर्थिक बचतही होत आहे. आमच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत अल्पावधीत चांगले परिणाम दिसून येत असल्यामुळे उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सदर शिबिर भरवण्याचा उद्देश हाच आहे की आमची सेवा सर्वांपर्यंत पोहोचून तिची माहिती सर्वांना मिळावी. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात तालुकास्तरावर देखील सेवा देण्याचा विचार आम्ही सुरू केला आहे. जसा प्रतिसाद मिळेल तशी आमच्या सेवेची व्याप्ती आम्ही वाढवणार आहोत. तेंव्हा ज्यांना ऐकण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये कांही समस्या असेल तर त्यांनी नक्की या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाॅ. राठोड यांनी केले.
कृष्णा स्पीच अँड हेअरिंग क्लिनिकचे ऑर्डीओलॉजिस्ट अँड स्पीच लैंग्वेज पॅथॉलॉजिस्ट डॉ. नागनाथ गौंड म्हणाले की, आम्ही ज्यांच्यामध्ये ऐकण्याचा आणि बोलण्याचा दोष आहे अशा आबालवृद्धांवर उपचार करतो. ऐकण्यासंबंधीच्या अनेक समस्या असतात. त्यामध्ये अलीकडच्या काळात ध्वनी प्रदूषण किंवा सातत्याने मोबाईल वापरामुळे बऱ्याच जणांची ऐकण्याची अर्थात श्रवणशक्ती कमी होत चालली आहे. अशा लोकांसाठी श्रवण यंत्रांचा चांगला फायदा होऊ शकतो. सध्याच्या आधुनिक युगात श्रवण यंत्रांमध्ये क्रांती होऊन विविध प्रकारची श्रवण यंत्रे विकसित झाली आहेत.
अल्पवयात श्रवणदोष आला असेल तर अशांसाठी न दिसणारी श्रवण यंत्रे उपलब्ध आहेत. जी कानाच्या आत बसवली जातात. यापैकी बरीच श्रवण यंत्रे ही रिचार्जबल आहेत त्यामुळे संबंधिताची श्रवणशक्ती वाढण्याबरोबरच सामाजिक जीवन अबाधित राहते. त्याचप्रमाणे अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लहान मुलांमध्ये ऑटिझमचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये वाचा आणि भाषेशी संबंधित समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे अशी मुले इतर मुलांपासून अलिप्त राहतात. मनामध्ये एक प्रकारचा न्यू गंड निर्माण झालेल्या अशा मुलांवर देखील आमच्या क्लिनिकमध्ये गेल्या 12 वर्षापासून प्रशिक्षित स्पीच थेरपीस्ट करून उपचार केले जात आहेत अशी माहिती डॉ. गौंड यांनी दिली.