Friday, December 27, 2024

/

हलगेकरांचे अभिनंदन तर सवदींचा निषेध : युवा समिती

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आपल्या मातृभाषेत मत मांडणे म्हणजे इतर भाषेचा अपमान होत नाही, तर इतर भाषेचा तिरस्कार करणे म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे असा टोला खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आमदार लक्ष्मण सवदी यांना मारत आमदार विठ्ठल हलगेकर यांचे अभिनंदन केले आहे.

भारतीय लोकशाहीत राज्यघटनेने जे अधिकार घालून दिलेत त्या प्रमाणे प्रत्येक भारतीयाला आपल्या मातृभाषेत आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, मग ती लोकसभेचे सभागृह असुदेत किंवा विधानसभेचे सभागृह किंवा अन्य कुठलही व्यासपीठ! असे म्हणत धनंजय पाटील आमदार हलगेकर यांचे समर्थन केले आहे.

कर्नाटक विधानसभेच्या बेळगावातील अधिवेशनाचे सूप वाजत असतांना खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी तालुक्यातील मराठी शाळा, तेथील शिक्षकांच्या समस्या, अंगणवाडी शिक्षिकांना केलेली कन्नड सक्ती,Halgekar savadi

अविकसित असलेले रस्ते,तसेच कळसा-भांडुरा प्रकल्पातून खानापूर तालुक्याचं हक्काचं पाणी दुसरीकडे वळवण्यात येतंय ते कदापि होऊ देणार नाही, या बद्दलची स्पष्ट भूमिका आपला मास्तरी बाणा दाखवत आपली मातृभाषा मराठीत मांडली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करीत आहोत असेही खानापूर युवा समितीने म्हटले आहे.

दुसरीकडे मराठीच्या आकसापोटी लक्ष्मण सवदी यांनी हलगेकर हे मराठीत आपले मत मांडत असतांना त्याचा विरोध केला, लक्ष्मण सवदी यांचा जाहीर निषेध करत आहोत खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.