Saturday, December 21, 2024

/

सरकार कोसळणार नाही; मंत्री एच. के. पाटील यांचा विश्वास

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटकातील काँग्रेस सरकार बहुमताने अस्तित्वात आले असल्यामुळे विरोधी पक्ष असो वा अन्य कोणीही त्यांनी आम्ही सरकार पाडू असे म्हणणे लोकशाही व्यवस्थेत उचित नाही. आमचे सरकार मजबूत आहे आणि ते कोसळणार नाही, असे राज्याचे कायदा व संसदीय व्यवहार मंत्री एच. के. पाटील यांनी स्पष्ट केले.

बेळगावमध्ये आज सोमवारी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले कुमार स्वामी सध्या अधिवेशनाच्या काळात सरकार पडेल असे सांगून आमच्या सरकारला हादरे देण्याचा प्रयत्न करत आहेत.

तथापि आम्ही खंबीर असून त्यांनी म्हंटल्याप्रमाणे आमचे सरकार कोसळणार नाही. यापूर्वी 17 जणांना मुंबईत नेऊन सरकार पाडणाऱ्यांना जनतेने धडा शिकविला आहे.

एकूणच सरकार पाडू असे म्हणणे ही लोकशाही चांगली घडामोड नाही, असे मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.