Sunday, May 19, 2024

/

वकील संरक्षण कायद्याबद्दल आमदार ॲड. पोनण्णांचा सत्कार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभेमध्ये वकील संरक्षण कायदा मंजूर होण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे मुख्यमंत्र्यांचे कायदे सल्लागार ज्येष्ठ वकील आमदार ॲड. पोनण्णा यांचा बेळगाव बार असोसिएशनतर्फे आज यथोचित सत्कार करून त्यांना धन्यवाद देण्यात आले.

बेळगाव बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सत्कारमूर्तींसह बेंगलोर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विबेक सुब्बारेड्डी, आमदार ॲड. सुदर्शन, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सचिन शिवण्णावर व सरचिटणीस ॲड. गिरीराज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर ॲड. सुधीर चव्हाण ॲड. शिवण्णावर, ॲड. गिरीराज पाटील आदींच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचे कायदे सल्लागार आमदार ॲड. पोनण्णा यांचा शाल घालून तसेच श्रीफळ, भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.Adv bar association

 belgaum

सत्काराला उत्तर देताना वकील संरक्षण कायदा अस्तित्वात येणे हे सर्वांच्या एकजुटीचे आणि प्रयत्नांचे फळ असल्याचे आमदार ॲड. पोनण्णा यांनी स्पष्ट करून आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

यावेळी आमदार ॲड. दर्शन, ॲड. विबेक सुब्बारेड्डी आदींनी वकील संरक्षण कायदा लागू होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल ॲड. पोनण्णा यांचे आभार मानून समायोचीत विचार व्यक्त केले. याप्रसंगी बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यातील विविध बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि बेळगावची वकील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.