Tuesday, May 28, 2024

/

राज्यात 60 वर्षावरील व्यक्तींना फेस मास्कची सक्ती

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारने आज सोमवारी जारी केलेल्या निर्देशानुसार राज्यातील सहव्याधी असलेल्या 60 वर्षे वयावरील व्यक्ती आणि खोकला, कफ व तापाची लक्षणे अनुभवणाऱ्यांनी फेस मास्क वापरणे अनिवार्य आहे. हा निर्णय शेजारील केरळ राज्यात कोरोनाचा (कोविड -19) उपप्रकार असलेला रुग्ण आढळून आल्यामुळे घेण्यात आला आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव यांनी पत्रकारांना सांगितले की, संबंधित लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांना शोधण्यासाठी वाढीव चांचण्या घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याबरोबरच राज्याच्या सीमावर्तीय जिल्ह्यांमध्ये वाढीव पाळत ठेवण्याचे उपाय अंमलात आणण्यास सांगण्यात आले आहे. परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले असून लोकांनी एकत्र येणे अथवा त्यांच्या वर्दळीवर कोणतेही निर्बंध नाहीत. तथापी लवकरच सरकारकडून आवश्यक सल्ला जारी केला जाईल असे सांगून जनतेने चिंता करण्याचे कारण नाही, असे मंत्री राव यांनी नमूद केले.

 belgaum

दोन दिवसांपूर्वी बैठक झाल्यानंतर आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी डॉ. के. रवी यांच्या नेतृत्वाखालील तांत्रिक सल्लागार समितीने काल बैठक बोलावली होती. त्या बैठकीत वरील प्रमाणे फेस मास्कसंदर्भात निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार सरकारने जनतेला फेस मास्क वापरण्याची सूचना केली असून हॉस्पिटल्स आणि आरोग्य केंद्रांना सज्ज राहण्याची सूचना केली आहे. सरकारच्या आदेशानुसार आता राज्याच्या केरळ जवळील कोडगू, मंगळूर आणि चामराज नगर या सीमावर्तीय जिल्ह्यांमध्ये वाढीव पाळत ठेवण्याचे उपाय अंमलात आणले जाणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.