बेळगाव लाईव्ह – बेळगाव येथील विधीमंडळ अधिवेशनाला काल सोमवारपासून सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणार्या प्रत्येक प्रश्नाला सरकार समर्थपणे उत्तर देईल.
अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीत गॅरंटी योजना अपयशी ठरल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. मध्य प्रदेशात विजय झालेल्या भाजपने गॅरेंटी योजना घोषित केलेल्या आहेत.परंतु निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेस गॅरंटी कार्ड कधीही वापरत नाही.
गरीब आर्थिक मागास सामाजिक सक्षमीकरणासाठी गॅरंटी योजना घोषित केलेल्या आहेत. आमचे सरकार सत्तेत येऊन सहा महिने झाले तरी भाजपला विरोधी पक्षनेत्याची निवड करणे शक्य झालेले नव्हते.
गेल्या सहा महिन्यात सरकारने अनेक चांगल्या आणि कल्याणकारी योजना घोषित केलेल्या आहेत. त्याचा लाभ विविध घटकांना मिळत आहे असेही सिद्धारामय्या यांनी यावेळी बोलताना सांगितले.