बेळगाव लाईव्ह :महापालिकेच्या आरोग्य विभागात बेकायदेशीरपणे नियुक्त १३८ सफाई कामगारांना दोन महिन्यांचे वेतन देऊन सरकारच्या आदेशानुसार सेवेत कायम केले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिली. महापौर शोभा सोमनाचे अध्यक्षस्थानी होत्या.
नगरसेवकांनी यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्या १३८ कर्मचाऱ्यांना केवळ दोन महिन्यांचे वेतन देण्यात आले आहे. त्यांच्या बेकायदेशीर नियुक्ती9प्रकरणी लोकायुक्त चौकशी करण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली होती.
त्या चौकशीचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर बोलताना आयुक्त दुडगुंटी
म्हणाले, १३८ कर्मचाऱ्यांना सरकारच्या सूचनेप्रमाणे दोन महिन्यांचे वेतन दिले आहे.
त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार नव्याने निविदा मागवून १३८ जणांना सेवेत कायम करुन घेण्यात आले. लोकायुक्त चौकशीबाबत मी कोणतेही वक्तव्य केले नव्हते, असे त्यांनी सांगितले. त्यावर आयुक्तांचे सभागृहातील वक्तव्य तपासून पाहावे, अशी विनंती नगरसेवकांनी केली.
सुवासिक अगरबत्ती बनविण्याचे काम सुरु
झाले आहे. यातून महापालिकेला कोणताही
महसूल मिळत नाही. पण, महापालिकेचा कचरा
उचल आणि वाहतुकीचा खर्च वाचला आहे,
अशी माहिती पर्यावरण अभियंता हणमंत
कलादगी यांनी दिली.
बेळगाव शहरातील नादुरुस्त कूपनलिका दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने एलॲण्डटी कंपनीला ना हरकत पत्र द्यावे तर शिवाजी मंडोळकर यांनी शिवाजीनगरमधील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करावे, असे सांगितले. मंगेश पवार यांनी लोकांनी पाणी जपून वापरावे यासाठी महापालिकेतर्फे जागृती करावी, अशी मागणी केली.
अनगोळ तलावात रायण्णा पुतळा
अनगोळ येथील तलावात संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा उभारणीला सभागृहात मंजुरी देण्यात आली. नगरसेवक श्रीशैल कांबळे यांनी हा विषय मांडला होता.