बेळगाव लाईव्ह: अनैतिक संबंधाच्या संशयातून कंग्राळी बी के येथे पत्नीने पतीचा संशयास्पद खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे.
सुभाष कल्लापपा हरुडे वय 56 असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. सुभाष याचा खून त्याची पत्नी रंजना हिने केल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला आहे.
या संबंधी मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुभाष याचा मृतदेह रिक्षातच संशयास्पद स्थितीत आढळून आला होता सुरुवातीला क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना हा प्रकार दिसला त्यांनी दिलेल्या माहिती नंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या सोमवारी सुभाषची पत्नी रंजना रात्री अडीच वाजता घरी आली होती त्यावेळी सुभाषने जाब विचारताच दोघात जोरदार भांडण झाले होते.
मंगळवारी दुपारी सुभाष हा ग्राम पंचायतीच्या महिला सदस्या कडे तक्रार करायला जाते वेळी रंजना हिने पाठलाग करून सुभाषला मारहाण केली होती घरात नेऊन देखील मारहाण केली होती त्यातच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर सर्व प्रकार ग्रामस्थांनी पहिला आहे असा आरोप त्याच्या भावांनी केला आहे. खुनाचे नेमके कारण खून कुणी केला हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी एपीएमसी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सुभाष याच्या पश्चात दोन मुली एक मुलगा दोन भाऊ असा परिवार आहे दरम्यान या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी पोलिसांनी लवकर तपास करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.