Saturday, November 9, 2024

/

बेळगाव पोस्ट विभागाची राज्यात प्रथम येण्याची ‘हॅटट्रिक’

 belgaum

बेळगाव लाईव्ह :साॅव्हरीन गोल्ड बॉंड योजनेअंतर्गत पाच दिवसात 8 किलो 952 ग्रॅम गोल्ड बॉंडच्या विक्रीतून 5 कोटी 54 लाख 93 हजार 448 रुपयांचा व्यवसाय करण्याद्वारे बेळगाव पोस्ट विभागाने सलग तिसऱ्यांदा कर्नाटक राज्यात पहिला क्रमांक पटकावत ‘हॅटट्रिक’ साधली आहे.

भारतीय पोस्ट खात्याची साॅव्हरीन गोल्ड बॉंड योजना बेळगाव पोस्ट विभागातर्फे गेल्या 18 ते 22 डिसेंबर अशा पाच दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आली होती.Virat

या काळात ग्राहकांनी 6,199 रुपये प्रति ग्रॅम दराने बॉण्ड खरेदी केले. सदर योजनेअंतर्गत दरसाल 2.5 टक्के व्याज मिळणार असून 8 वर्षापर्यंत यामध्ये पैसे गुंतवता येऊ शकतात. तसेच पाच वर्षानंतर आपली गुंतवणूक आपल्याला काढता येऊ शकते. पोस्ट खात्यातर्फे या महिन्यात या वर्षातील तिसऱ्यांदा ही योजना राबविण्यात आली.Post office

यापूर्वीच्या दोन्ही वेळेला बेळगाव पोस्ट विभागाचा राज्यासह देशात पहिला क्रमांक आला होता. यावेळीही राज्यात पहिला क्रमांक पटकावून बेळगाव पोस्ट विभागाने हॅटट्रिक साधली आहे.

बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयासह उपनगरातील पोस्ट कार्यालय तसेच बेळगाव, सौंदत्ती, खानापूर, रामदुर्ग, बैलहोंगल व कित्तूर या तालुक्यातील 69 पोस्ट ऑफिस मधील अधिकारी व पोस्टमननी ही योजना यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.Mahila aaghadi

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.