बेळगाव लाईव्ह:काळ आला होता पण वेळ आली नव्हती .. रात्रीची वेळ रस्त्याच्या कडेला थांबलेला कॅन्टर आणि भरधाव वेगाने त्यावर आदळलेली कार दृश्य होते हृदयाचे ठोके चुकवणारे आणि काळजाचा थरकाप उडविणारे पण काही वेळा अचंबित घटना घडतात तशी घटना घडली आणि चक्काचूर झालेल्या गाडीत सुदैवाने बचावले.
पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग हालगा येथील ब्रीज वर दुहेरी अपघातात कारचा चक्काचूर झाला पण सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही कार मध्ये सवार आलेले तिघेही किरकोळ जखमी झाले असून केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावले आहेत.
गुरुवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. घटनास्थळावरून आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दुहेरी होता.
सुरुवातीला त्या ब्रिजवर टायर फुटून ऊसाचा ट्रक पलटी झाला होता त्या ट्रकच्या अगोदर 100 फुटाच्या अंतरावर कॅन्टर थांबला होता.
थांबलेल्या कॅन्टरला पाठीमागून कारने जोराची धडक बसल्याने कारचा चक्काचूर झाला पण कोणतीही मोठी जीवित हानी झाली नाही. अपघातात अडकलेल्या कारला क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्यात आले.
घटनास्थळी हिरेबागेवाडी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला रात्री अपघात स्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.