बेळगाव लाईव्ह: गेल्या कित्येक महिन्या पासून चर्चेत असलेले अन् वादाच्या भोवऱ्यात अडकले जिल्हा शिक्षणाधिकारी पद कधी भरले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील महिन्यात शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड हे लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकल्या नंतर हे पद रिक्त असून कार्यभार प्रभारी यांच्याकडेच आहे.
डी डी पी आय कार्यालयावर २० ऑक्टोबर रोजी पडलेल्या लोकायुक्त छाप्यात जिल्हाशिक्षणाधिकारी बसवराज नालतवाड अडकले. तेव्हापासून डायटचे प्राचार्य एस. डी. गांजी प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. या पदावर अद्याप कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नसल्याने अनेक कामे रखडली आहेत.
जिल्हाशिक्षणाधिकारी पदावरुन मध्यंतरी वादंग उठले होते. बसवराज नलतवाड यांची नियुक्ती होण्याआधीच सरदार्स बीएड कॉलेजचे प्राचार्य जिल्हाशिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांची या पदावर नियुक्ती झाली.
नालतवाड यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते. त्यामुळे, त्यांनी कर्नाटक प्रशासकीय लवादाकडे (केएटी) दाद मागितली. केएटीच्या निर्णयानुसार त्यांची पुन्हा यांची जिल्हाशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाली नाही. तेसुद्धा न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
हा गोंधळ सुरु असतानाच एका खासगी शाळेच्या परवाना नुतनीकरणासाठी ४० हजार रुपयाची लाच स्वीकारताना लोकायुक्त खात्याने जिल्हाशिक्षणाधिकारी नालतवाड यांना रंगेहाथ पकडले. तेव्हापासून जिल्हाशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे शाळांसबंधीची कामे खोळंबली आहेत. प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून डायटचे प्राचार्य गांजी काम पाहत असले तरी त्यांच्यावर जिल्हा शिक्षणाधिकारीपदी कायमस्वरूपी अधिकाऱ्याची गरज आहे.एकूणच सध्या वादाच्या भोवऱ्यात आणि चर्चेत अडकलेले डी डी पी आय पदी कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.