बेळगाव लाईव्ह:बेलगाम डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल ग्रोव्हर्स, सेलर्स अॅण्ड परचेजर्स को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्ष, संचालकांविरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. ठेवी परत न दिल्यामुळे दाखल तक्रारीवर हा वारंट बजावण्यात आला आहे. त्यानुसार अध्यक्ष, संचालकांना १५ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
ठेवी परत करणे आवश्यक आहे. पण, ठेवी मिळाल्या नसल्यामुळे शेतकरी आणि इतर सभासदांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात सोसायटीने सुमारे पाच कोटी रुपयांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. एक ठेवीदार मीनाक्षी पाटील यांनी तक्रार केली होती. सुनावणीला जिल्हा ग्राहक न्यायालयात हजर न राहिल्याने अध्यक्ष, संचालकांविरोधात हे अजामीनपात्र वॉरंट जारी झाले आहे.
सोसायटीचे अध्यक्ष शंकर नाईक, मोहन मन्नोळकर, उमेश पाटील, राम हावळ, दिवाकर पाटील, सागर जगताप, इक्बाल डोणी, पराग कटांबळे, व्यवस्थापक ए. आर. हुपरी यांच्याविरोधात पाटील यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली.
त्यानुसार २७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता ग्राहक- न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अध्यक्ष व संचालक हजर न राहिल्याने हा अपात्र जामीन वॉरंट जारी केले आहे.
पोलिस आयुक्तांनाही नोटीस
यासंबंधी ग्राहक न्यायालयाने पोलिस आयुक्तांनाही कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. तसेच अध्यक्ष शंकर नाईक, मोहन मन्नोळकर, उमेश पाटील, इक्बाल डोणी, पराग कटांबळे, मॅनेजर ए. आर. हुपरी यांना १५ नोव्हेंबरला न चुकता हजर करण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या आहेत.