बेळगाव लाईव्ह :हेस्कॉमकडून त्रैमासिक देखभालीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे येत्या रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी नेहरूनगर आणि वडगाव फीडर्सचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
यामुळे रविवारी वीजपुरवठा खंडित होणारे शहराचे भाग पुढील प्रमाणे आहेत. नेहरूनगर फिडर : इंडाल, शिवाजीनगर, वैभवनगर, शिवबसवनगर, सदाशिवनगर जनबकुळ, सिव्हिल हॉस्पिटल, सुभाषनगर विश्वेश्वरय्यानगर,
वॉटर सप्लाय या ठिकाणचा वीज पुरवठा रविवारी 26 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खंडित राहील.
वडगाव फिडर : बाजार गल्ली, वडगाव, जुने बेळगाव, होसुर, सुभाष मार्केट, विद्यानगर, भाग्यनगर, येळ्ळूर रोड या ठिकाणचा वीजपुरवठा रविवारी 26 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खंडित असेल.