बेळगाव लाईव्ह:जिल्हा प्रशासनाने आम्हाला सांगिलेल्या एफआरपीपेक्षा अधिक दर आम्ही जाहीर केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे असे मत मार्कंडेय साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आर. आय. पाटील यांनी व्यक्त केले.
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याने यंदा प्रती टन 2900 रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून अध्यक्षस्थानी तानजी पाटील होते.
मार्कंडेय साखर कारखान्याचे शुक्रवारी गाळप हंगाम सुरू झाला. यंदाच्या गाळप हंगामाबाबत आज कारखाना स्थळावर महत्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांना यंदा प्रती टन 2900 रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहन करण्यात आले.
मार्कंडेय साखर कारखान्याच्या इतिहासात सर्वाधिक दर देण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यानुसार पहिला हप्ता 2900 रुपयांचा असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्याला उसपूरवठा करावा असे आवाहन मार्कंडेय साखर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी केले आहे.
यंदा कारखान्याने 3 लाख टन ऊस गाळप करण्याच्या उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुक्यातील एकमेव साखर कारखान्याला ऊस पाठवून मदत करावी, असे आवाहन करण्यात आले. वजन काठ्यात कोणत्याही प्रकारे गफलत करण्यात येत नाही. शेटक्यांच्या कष्टाला मोल देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या बैठकीला अध्यक्ष तानाजी पाटील यांच्यासह उपाध्यक्ष आर. आय. पाटील, संचालक अविनाश पोतदार, जोतिबा अंबोळकर, बाबुराव पिंगट, शिवाजी कुट्रे, सुनील अष्टेकर, चेतक कांबळे, बाबासाहेब भेकणे, बसवंत मायानाचे, लक्ष्मण नाईक, वसुधा म्हाळोजी, वनिता अगसगेकर आदि उपस्थित होते.