Saturday, January 18, 2025

/

सतीश जारकीहोळी 30 आमदारांसह विदेश दौऱ्यावर?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे पक्षाच्या ३० आमदारांसह विदेश दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारमध्ये चलबिचल आहे. याआधी दसरोत्सवात जारकीहोळी यांनी २० आमदारांसह म्हैसूर दौरा आखला होता. मात्र ऐनवेळी तो रद्द करण्यात आले.

मंत्री जारकीहोळी समर्थक आमदारांसह दुबई दौऱ्यावर जाणारआहेत. राज्यातील काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बंगळूरला धाव घेत चर्चा केली आहे. पदांचे वितरण, ऑपरेशन कमळ, आमदारांची नाराजी या पार्श्वभूमीवर अ. भा. काँग्रेसचे आमदारांसह दुबई दौऱ्यावर जाणार सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल,रणदीपसिंग सूरजेवाला यांनी बंगळूर येथे सभा घेतली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याबरोबर चर्चा केली. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करुन राज्यातील सर्व परिस्थितीची जबाबदारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर सोपवण्यात आली.

मंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांचे ३० समर्थक आमदार विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्याचा सल्ला बैठकीत

देण्यात आला. त्याचबरोबर पदांचे वाटप, महामंडळांवरील नेमणुका यावरुन पक्षातील कार्यकर्ते व आमदार यांच्यामध्ये निर्माण झालेल्या असंतोषाबाबत चर्चा केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या भोजन कार्यक्रमाबाबतही विचारणा करण्यात आली. पहिल्याच वेळी निवडूण आलेल्या आमदारांच्या मंत्रिपद मागणीबाबत नाराजी व्यक्त येईल. केली. बैठकीनंतर माहिती देताना
सूरजेवाला म्हणाले, पक्षातील अंतर्गत मतभेद, पक्ष संघटना याबाबत पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी जाहीर वक्तव्ये करु नयेत. पक्षाची शिस्त पाळावी. अन्यथा अशा नेत्यांवर कारवाई करण्यात आमदारांनी आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यावर भर दिला पाहिजे. पक्षाच्या पातळीवरील कोणतेही मतभेद जाहीर करु नयेत. सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. परंतु पक्षाच्या धक्का पोहोचवणाऱ्या बाबी खपवून घेणार नाही, म्हणाले. असेही सूरजेवाला.म्हणाले.

महामंडळ अध्यक्ष निवडी १७ नंतर

आगामी पंधरा दिवसांत लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांची यादी देण्याची सूचना करण्यात आली आहे. हमी योजनांची माहिती सामान्यांपर्यंत नेण्याचेही बजावण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. १७ नोव्हेंबरनंतर राज्यातील महामंडळ पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.