Saturday, January 25, 2025

/

बेळगावच्या वृद्धाश्रमाचा रील झाला… हिट

 belgaum

बेळगाव लाईव्ह:सोशल मीडियावर आपली कलाकारी सादर करणाऱ्यांना व्हीवर्स चांगलाच प्रतिसाद देतात आणि एका रात्रीत कोणीही प्रसिद्ध होऊ शकतो. फक्त ती कला कशी सादर करायची याचे योग्य ते संदर्भ पाळावे लागतात.

डिजिटल मार्केटिंगच्या जमान्यात आता नव नवीन प्रकार दाखल होत आहेत. त्यामध्ये इंस्टाग्राम वरील रिल हा एक प्रकार मोठ्या प्रमाणात फेमस होतोय. त्याच प्रकारावर रिलच्या माध्यमातून बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमाच्या आजींनी चक्क 1.8 मिलियन व्ह्युज मिळवले आहेत. सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेल्या *सो ब्युटीफूल, सो एलिगंट रियली लाईक wow नावाच्या रील च्या म्युझिक चा वापर करून शांताईच्या आजीन्नी केलेला छोटासा डान्स सर्वत्र व्हायरल होत आहे.

यापूर्वी त्यांनी केलेल्या एका रीलला साधारणपणे दोन कोटी views मिळाले होते.

 belgaum

आयुष्याची सायंकाळ अतिशय आनंदात जगण्याची संधी आजी-आजोबांना शांताई मध्ये दिली जात आहे. त्याचबरोबर त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचाही उपक्रम नेहमीच केला जातो. कार्याध्यक्ष विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे काम चाललेले असते. आता यामध्ये त्यांची कन्या शरल मोरे हीने ही पुढाकार घेतला आहे.Reel hit

नव्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आजी आजोबांची कला जगासमोर मांडण्यासाठी शरल मोरे पुढे आली असून तिने आजी आजोबांचे रील बनवत शांताई वृद्धाश्रम या इंस्टाग्राम अकाउंट वर घालण्यास सुरुवात केली आहे. सर्वत्र हे रील वायरल होत असून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे.

वृद्धाश्रमाच्या एकंदर उपक्रमांची माहिती आणि इतर साऱ्या गोष्टीं इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच आता जगाला कळविल्या जात आहेत. प्रसिद्धीची नवनवीन माध्यमे पुढे येत असताना त्यावर स्वार होऊन आश्रमाचे कार्य आणि तेथील आजी-आजोबांची कला जगभर पसरवण्याचा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.