बेळगाव लाईव्ह :- हवामान खात्याने देशातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता गेल्या काही दिवसांपुर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकात विविध ठिकाणी गेल्या चार अवकाळी पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.
दरम्यान कर्नाटकातही काही ठिकाणी गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळले आहेत. बेळगाव परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून आकाशात काळे ढग दिसून येत होते.
त्यानंतर आज बुधवारी सकाळी सकाळी अवकाळी पावसाने बेळगाव शहर आणि उपनगरात दमदार हजेरी लावली. एका बाजूला भात कापणीत गुंतलेले शेतकरी अवकाळी पावसाने धास्तावले आहेत.
या अवकाळी पावसाने बेळगाव परिसरातील भात पिकाला नुकसान होणार आहे कारण सध्या परिस्थितीत भात कापणी सुरू असून कापलेली भात पीक पावसात सापडल्याने पाने होण्याची शक्यता आहे त्यामुळे अवकाळी पावसाने या वर्षी अल्प प्रमाणात आलेले पीक देखील खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भात पोसण्यासाठी आणि कडपाल पेरणी साठी या पावसाचा ओलीचा फायदा होऊ शकतो. एकूणच अवकाळी पावसाने फायद्या पेक्षा शेतकऱ्यांना नुकसान अधिक आहे.
बुधवारी सकाळी पासून हवेत गारठा असून गडगडाट होऊन पावसाला सुरुवात झाली आहे.सकाळच्या सत्रात एकदम पाऊस आल्याने शहरातील रस्त्यावर गायब झालेले छत्र्या रेनकोट पुन्हा दिसू लागले आहेत. ऐन पावसात गायब झालेला हा पाऊस हिवाळ्याच्या तोंडावर हिवसाळा बनला आहे अशी चर्चा सुरू आहे