बेळगाव लाईव्ह:कृषी कायदा 2020 रद्द करण्यात यावा या मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या 4 डिसेंबर 2023 रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेने महापालिका आयुक्तांना कळविले आहे.
कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेने एका निवेदनाद्वारे आपल्या आंदोलनाची माहिती महापालिका आयुक्तांना दिली आहे.
ऊसाला प्रतिक्विंटल 25 हजार रुपये दर देण्यात यावा, उसाच्या एफआरपी सोबत एसएपी भरला जावा, कृषी कायदा 2020 रद्द केला जावा, महागाई आणि मेकेदाटू योजना लवकरात लवकर सुरू कराव्यात, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जावे,
दुष्काळी मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावा, शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा येणे बंद केले जावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर आंदोलन छेडले जाणार असल्याचे कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेने मनपा आयुक्तांना कळवले आहे.