बेळगाव लाईव्ह : झिका व्हायरस बाबत राज्यातील आरोग्य खात्याने अलर्ट दिला असताना बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांनी 34 नंबर सरकारी मराठी शाळेला भेट देऊन तेथील परिसरातील स्वच्छतेची तपासणी केली.
त्याच बरोबर तेथे पडलेला कचरा त्याची त्वरित उचल करून तिथं डांस प्रतिबंधक फवारणी करण्याची सूचना केली त्याच बरोबर शाळेतील शिक्षकांनी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती जाणून घेतली.
महापौरांनी यावेळी शाळेत काही कमतरता असल्यास कळविण्याची सूचना केली.त्याच बरोबर शाळेत येणाऱ्या पाण्याची तपासणी करून शुद्ध आणि स्वच्छ पाणी नळाला येते की नाही याचीही पाहणी केली. यावेळी शिक्षकांनी महापौरांच्या भेटी बद्दल समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्याचे आरोग्य महत्वाचे आहे म्हणून शाळेचा परिसर व विद्यार्थ्यांना मिळणारे पाणी हे स्वच्छ असणे गरजेचे आहे यासाठी महापौर म्हणून मी अग्रक्रमाने काम करणार आहे असे महापौर शोभा सोमनाचे यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना म्हटले आहे.
एकंदर महापौरांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शाळा परिसर स्वच्छ झाला तर मुलांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.त्याच बरोबर महापौरांनी नियमितपणे शाळांना भेट दिली तर आरोग्य खात्यातील कर्मचारी अलर्ट मोडवर येऊन तेथील परिसर स्वच्छ ठेवणे वेळोवेळी औषधाची फवारणी करणे आणि आरोग्य विषयक शिबिरे घेणे अशी कामे करतील हे निश्चितच विद्यार्थ्यांचा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.