बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात विकासकामे राबविण्यासाठी महापौरांना महापालिकेकडून १ कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर असतो. तर उपमहापौरांना ५० लाखांचा निधी मिळतो. पण, गेल्या नऊ महिन्यांत अधिकाऱ्यांनी हा निधी महापौरांना अद्याप उपलब्धच करुन दिला नाही. त्यामुळे, तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेत नगरसेवकांना प्रभाग निधी देण्यात येतो. या निधीतून प्रभागातील विकासकामे करता येतात.
सध्या नगरसेवकांना २७ लाख रुपयांचा प्रभाग निधी आहे. तशाच प्रकारे महापौरांना एक कोटी रुपयांचा निधी आहे. हा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. पण, अधिकाऱ्यांकडून सातत्याने टोलवाटोलवी करण्यात येत आहे. या निधीसाठी स्थायी समिती बैठकीत ठराव करून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पण अधिकाऱ्याकडून सातत्याने टोलवा टोलवी केली जात आहे या निधीसाठी स्थायी समिती स्थायी समिती बैठकीत ठराव करून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे पण अद्याप निधी दिला नसल्यामुळे विकासकामे रखडली आहेत. अधिकारी जाणीवपूर्वक निधी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत सत्ताधारीविरोधात अधिकारी आणि पालकमंत्री यांचा वाद रंगला आहे. राजकारण तापले आहे. नगरप्रशासन संचलनालयाने महापालिका सभागृह का बरखास्त करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या राजकारणात महापौरांचा विकास निधी मात्र अद्याप देण्यात आला नाही. त्यामुळे, अधिकारी सत्ताधाऱ्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप होत आहे. शोभा सोमनाचे यांच्या महापौरपदाचा कार्यकाळ तीन महिन्यांत संपणार आहे. तत्पूर्वी तरी हा निधी मिळणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
महापौरां व्यतिरिक्त नगरसेवकांच्या निधी मिळाला नाही प्रत्येक नगरसेवकांना सत्तावीस लाख रुपये निधी देणार होता तो पण अजून पर्यंत आलेला नाही.नगरसेवकांनी वार्डामध्ये निधी नसल्याकारणांना विकास कामे होत नाहीत व कामगारांची कमतरता असल्यामुळे स्वच्छता पण वाढत न होत नाही अश्या तक्रारी केल्या आहेत.