बेळगाव लाईव्ह : खानापूर येथील कॅनरा बँकच्या शाखेत आग लागल्याने नुकसान झाले आहे.शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. घटना समजताच अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. खानापूर पोलीस स्थानकाचे पीएसआय गिरीश एम. पोलीस कर्मचारी जयराम हमन्नावर, बसवराज तेगूर, यांच्या सहकार्याने अग्नीशामक दलाचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रात्री किती वाजता आग लागली हे समजू शकले नाही. परंतु पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी याची माहिती अग्निशमक व पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी व पोलीस खात्याचे कर्मचारी धावून आले. त्यांनी आग आटोक्यात आणली असून, आत मध्ये धूर कोंडल्याने अग्निशामक दलाचे कर्मचारी व अधिकारी तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून आग विझविली
प्रथमदर्शनी पाहिले असता या आगीत संपूर्ण फर्निचर कागदपत्रे व कॉम्प्युटर व इतर वस्तू जळून खाक झाल्याचे दिसून येत आहे.
पैसे ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम पर्यंत आग पोहचू शकली नाही असे समजते. संपूर्ण आग विझवल्यानंतरच याबाबत किती हानी झाली हे समजणार आहे. आत मध्ये धूर कोंडल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना त्रास होत होता.