बेळगाव लाईव्ह;चिक्कमंगळूर जिल्ह्यातील बाबा बुडणगिरी येथील दत्त पिठाला भेट दिल्यानंतर दत्तमाळ परिधान करणारे निजद नेते एचडी कुमारस्वामी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी “तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि आपल्या इच्छेप्रमाणे वागणे हा त्यांचा अधिकार आहे. भाजपचे हात मिळवणी केल्यानंतर अशा कृती करून ते ‘युतीचा धर्म’ पाळत आहेत” असा टोला लगावला आहे.
शहरामध्ये आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलीस खात्यातील बदलांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या कुमारस्वामी यांनी केलेल्या आरोपासंदर्भात बोलायचे झाल्यास राज्यातील काँग्रेस आणि निधर्मी जनता दल (निजद) यांचे युतीचे सरकार असताना कुमार स्वामी मुख्यमंत्री होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो ते बहुदा विसरले असावेत की पोलिसांच्या बदल्या या पोलीस आस्थापना मंडळामार्फत (पीईबी) होत असतात.या प्रक्रियेबाबत बहुदा त्यांचे ज्ञान तोकडे असावे, असे गृहमंत्री परमेश्वर पुढे म्हणाले.
बेळगाव शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातून कौटुंबिक वादातून खुन सारख्या घटना वाढल्या आहेत काही प्रमाणात गुन्हे वाढले आहेत. जमीन आणि कौटुंबिक वादातून खुनाच्या घटना वाढल्या आहेत अश्या स्वरूपाचे ते गुन्हे कसे रोखता येतील यावर पोलीस खात्याने प्रयत्न करावे अश्या सूचना दिल्या आहेत असे परमेश्वर यांनी यावेळी सांगितले.
वेगवेगळ्या जिल्ह्यातून येणाऱ्या साडे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त हिवाळी अधिवेशनास असणार असून पोलीस आयुक्त एस पी आणि आय जीं पी यांनी अधिवेशन बंदोबस्तात येणाऱ्या अधिकाऱ्यांची सोय केलेली आहे कोणतीही अडचण बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांना येऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.
बेळगावचे अधिवेशन केवळ आंदोलने बघण्यासाठी आयोजित केले जाते असा संदेश जात आहे त्यासाठी कमीत कमी आंदोलने व्हावीत यासाठी प्रयत्नशील असून जनतेच्या समस्या कमी करा यासाठी जिल्हाधिकाऱ्यानी विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले आहे.
पत्रकार परिषदेस बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू शेठ, शहर पोलीस आयुक्त सिद्धारामप्पा, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते.