Tuesday, January 28, 2025

/

हेस्कॉम’ची ऑनलाईन सेवा तीन दिवस बंद

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हेस्कॉमसह राज्यातील पाच वीज वितरण कंपन्यांची ऑनलाईन सेवा शुक्रवारपासून दि. २४ ते रविवारपर्यंत दि. २६ बंद राहणारआहे.

वेब पोर्टलची दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कंपन्यांनी दिली आहे.

राज्यात हेस्कॉमसह गेस्कॉम, मेस्कॉम, चेस्कॉम व बेस्कॉम अशा पाच कंपन्या वीज वितरणाचे काम करतात.’ राज्यातील ९६ शहरांतील वीज ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट सिस्टिमचा लाभ मिळतो. मात्र ही सेवा २४ ते २६ या

 belgaum

काळात तीन दिवस बंद राहणार आहे. शुक्रवारी दुपारी १२ पासून रविवार दि. २६ सकाळी ११.५९ पर्यंत या सेवा बंद राहतील. त्यामुळे, ऑनलाईनच्या माध्यमातून वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होणार आहे.

वेब पोर्टलच्या आपत्कालीन तांत्रिक देखभालीच्या कामामुळे ही सेवा बंद विस्कळीत होणार आहे. डेटा नवीन पोर्टलवर हस्तांतरित करण्याचे काम सुरु असल्याने ऑनलाईन सेवा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे, दोन दिवस वीज बिल भरणा, नवीन कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्जासह कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही असे कळविण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.