Saturday, November 16, 2024

/

अलारवाड ब्रीज सर्कल येथे हालगावासीयांची निदर्शने

 belgaum

बेळगाव लाईव्ह :अपघात प्रवण क्षेत्र बनलेल्या अलारवाड ब्रीज सर्कलची तात्काळ युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी हालगा येथील जिजाऊ महिला मंडळ, हालगा ग्रामस्थ आजी -माजी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांतर्फे आज मंगळवारी सकाळी अलारवाड ब्रीज सर्कल येथे निदर्शने करत आंदोलन छेडण्यात आले.

अलारवाड ब्रीज सर्कलची गेल्या 6 वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे या सर्कलच्या ठिकाणी प्रस्ताव उघडून मोठ्या प्रमाणात खाचखळगे पडले आहेत परिणामी या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे.

यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे हालगावासीयांतर्फे आज मंगळवारी सकाळी सदर सर्कलच्या ठिकाणी आंदोलन छेडून प्रशासनाने या सर्कलची तात्काळ डागडुजी करावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात ॲड. अण्णासाहेब घोरपडे, मालन घोरपडे, सुजाता कामानाचे, कल्पना हनुमंताचे, सरिता येळ्ळूरकर, गीता कामानाचे, मनीषा कामानाचे, रूपा येळ्ळूरकर, रेणू मास्तमर्डी, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सागर कामानाचे, किरण हनुमंताचे, राजू काल्लिंग प्रफुल्ल मास्तमार्डी आदींसह ग्रामस्थांचा सहभाग होता.

आपल्या आंदोलनासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना ॲड. अण्णासाहेब घोरपडे म्हणाले की, गेल्या 5 -6 वर्षापासून या अलारवाड क्रॉस जवळ मच्छे -हालगा बायपासच्या निमित्ताने येथील सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे करण्यात आले मात्र ते व्यवस्थित बुजवण्यात आलेले नाहीत.

सदर सर्कलच्या ठिकाणी वाहनांची कायम मोठी वर्दळ असते. तथापि प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे या सरकारच्या ठिकाणी अलीकडे लहान -मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर सर्कलच्या ठिकाणी गतिरोधक व्यवस्थित नाहीत, सिग्नल व्यवस्था नाही. यात भर म्हणून या ठिकाणी खणण्यात आलेले खड्डे व्यवस्थित न बुजवल्यामुळे हा सर्कलचा रस्ता सर्वांसाठीच धोकादायक बनला आहे. तरी प्रशासन किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदर सर्कलचा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याबरोबरच या ठिकाणी चांगल्या गतिरोधक व सिग्नलची व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे. येत्या 4 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौध येथे सरकारचे हिवाळी अधिवेशन आहे.Deewali yuvraj

तेंव्हा त्या निमित्ताने तरी या सर्कल मधील समस्या दूर करण्यात याव्यात असे सांगून या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आम्ही यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडू, प्रसंगी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील करू असा इशारा आम्ही जिल्हाधिकारी प्रशासनाला देत आहोत, असे ॲड. घोरपडे यांनी शेवटी स्पष्ट केले.Deewali 1

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.