बेळगाव लाईव्ह : हलगा येथील सुवर्ण विधान सौध परिसरामधील गवत प्रत वर्षी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जनावरांना चारा म्हणून दिले जाते मात्र यावर्षी तसे न करता जाळून टाकले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
दुष्काळ असताना सौध परिसरातील गवताने या भागातील शेतकऱ्यांना चारा उपलब्ध झाला असता मात्र तो जाळून टाकत जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हिवाळी अधिवेशन दरम्यान सुवर्ण सौधा परिसरातील गवताचे कात्रन करून शेतकऱ्यांना चारा म्हणून दिले जात होते. हालगा, बस्तवाड,कोंडसकोप्प,आणि शगनमट्टी गावचे शेतकरी जनावरांना चारा म्हणून गवत कापण्याची परवानगी दिली जात होती मात्र या वर्षी पाऊसच प्रमाण कमी झाल्यामुळे व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्या मुळे शेतकरी चिंतेत आहे असे असताना सरकारने अधिवेशन आहे म्हणून महिना अगोदरच ओले गवत J C B आणि कापणी यंत्राच्या साहाय्याने कापून टाकण्यात आले आहे.
केवळ एका महिन्यात ते कापलेले गवत वाळून आता करड झालं आहे.शेतकऱ्यांना ओला चारा तर दिला गेला नाही या शिवाय वाळलेले गवत सुध्दा J C B च्या साहाय्याने अधीकारी सूचना देऊन जाळत आहेत.
शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नाईक यांनी गवताचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारला दुष्काळ असताना जनावरांच्या तोंडात जाणाऱ्या चाऱ्याचे नुकसान योग्य नव्हे अश्या शब्दात टीका केली आहे.
हलगा येथे आधीच सुवर्ण विधान सौध मध्ये संपादित केलेली जमीन गेलेली असताना येथील शेतकरी वर्गाला जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याचं वेळी सरकारने स्थानिकांना नोकरी देतो म्हणून आश्वासने पण दिली होती त्याचीही पूर्तता केली नसून
दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरवले जाते करोडो रुपयाचा चुराडा करून मौज मस्ती केली जाते. या ठिकाणी गावात जमणारा कचरा आंदोलकांचा आवाज, पोलिस प्रशासन लोकांना वेठिस धरणे ट्रॅफीक, प्रदूषण नियंत्रण, आशा अनेक गोष्टी ना येथील हालगा परिसरातील जनतेला सामोरे जावे लागते मात्र शासन इकडे लक्ष देत नाही असा आरोप केला जात आहे.बेळगावचे हे हिवाळी अधिवेशन नसून राजकारणी लोक जत्रा भरवितात अशीही टीका केली जात आहे.