Sunday, July 21, 2024

/

अंजली निंबाळकरांच्या गळ्यात केपीसीसीचे मोठे पद?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस कडून निवडणूक लढवताना पराभूत झालेल्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांना कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे मोठे पद मिळण्याची शक्यता आहे कारण देखील मोठे आहे खुद्द बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी निंबाळकर यांना पद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा बेळगाव केंद्रस्थानी आले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी सरसावले असून, त्यातून खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची वर्णी महिला काँग्रेस अध्यक्षपदी किंवा के पी सी सी कार्याध्यक्षपदी लागणार असण्याचे संकेत मिळत आहेत.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना पाठबळ देण्याचे काम उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सतत केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे समर्थक म्हणून ओळख असणारे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.Anjli nimbalkar

मध्यंतरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याही अंतर्गत गोटातून बाहेर पडलेले सतीश जारकीहोळी सध्या शिवकुमार यांच्या राजकारणामुळे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या गोटात सामील झाले आहेत. पुन्हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जाऊ लागले आहेत.

प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पक्षावर पकड निर्माण केली आहे. त्यांना आवर घालण्यासाठी प्रतिडाव टाकण्याचा प्रयत्न जारकीहोळी यांच्याकडून सुरू आहे. त्यातूनच खानापूरच्या माजी आमदार डॉ. निंबाळकर यांना महिला काँग्रेस अध्यक्षपदी किंवा प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष पदी नेमणूक करण्याची
खेळी जारकीहोळी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून शिवकुमार यांच्याबरोबर हेब्बाळकर यांनाही शह देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी हाय कमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.Deewali 1
दोन दिवसांपूर्वी डी. के. शिवकुमार यांनी सतीश जारकीहोळी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचे बंधू खासदार डी. के. सुरेश यांनीही जारकीहोळींची भेट घेतली. यावेळी जारकीहोळींनी पक्षपातळीवर चर्चा केल्याची माहिती उघड झाली आहे.

एकूणच या सगळ्या राजकारणात खणापुरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांना मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. निंबाळकर यांचे महाराष्ट्र लिंक आणि दिल्ली दरबारी असलेले वजन पाहता के पी सी सी व्यतिरिक्त कारवार मतदार संघाची काँग्रेसची उमेदवारी देखील मिळू शकते अशीही शक्यता व्यक्त होत आहे.Deewali 1

काय आहेत अटी

शिवकुमार आणि सुरेश या दोघांच्याही भेटींमध्ये जारकीहोळींनी काही अटी घातल्याचे सांगण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या टप्प्याटप्प्याने करण्यात याव्यात, ही मुख्य अट आहे.

त्याच बरोबरपक्षाच्या कार्याध्यक्षपदी माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची नेमणूक करावी. लिंगायत समाजाचे नेते असणारे कुलकर्णी यांची नेमणूक केल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असे सांगितले आहे.Deewali 1

विशेष म्हणजे पंचमशाली समाजाच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जातीच्या माध्यमातून पक्ष आणि राजकारणात स्थान बळकट केले आहे. त्याचबरोबर लक्ष्मण सवदी यांची पक्ष कार्याध्यक्षपदी नेमणूक करावी, अशी हेब्बाळकर यांनी मागणी केली आहे. याविरोधात कुलकर्णी यांचे नाव पुढे करत जारकीहोळी यांनी प्रतिडाव टाकला आहे. सवदी यांना मंत्रिपद द्यावे तर कुलकर्णी यांना कार्याध्यक्ष करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.Deewali 1

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.