Saturday, January 25, 2025

/

माजी नगरसेवक संघटना अध्यक्षपदी शिवाजी सुंठकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :माजी नगरसेवक संघटना बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी शिवाजी केदारी सुंठकर यांची तर सरचिटणीसपदी दीपक ईश्वर वाघेला यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

खडेबाजार बेळगाव येथील आर. एन. हॉटेलच्या सभागृहात आज बुधवारी दुपारी माजी नगरसेवक संघटना बेळगावची बैठक पार पडली. माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेची नूतन कार्यकारणी निवडण्यात येऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर व माजी आमदार रमेश कुडची, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी महापौर सरिता पाटील, नीलिमा चव्हाण, माजी नगरसेवक दीपक वाघेला व लतीफखान पठाण उपस्थित होते. प्रारंभी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संघटना कशा प्रकारे बळकट करता येईल यावर आपले विचार व्यक्त केले.

 belgaum

अध्यक्षीय भाषणात नागेश सातेरी यांनी बेळगाव महापालिकेतील सभागृहासह महापौर वगैरेंचा अवमान होत आहे आणि हे सर्व बंद झाले पाहिजे असे सांगितले. आतापर्यंतच्या महापालिकेतील सर्व कौन्सिलचा अनुभव आणि कार्यपद्धतीची माहिती देताना विद्यमान कौन्सिलच्या कार्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे असे मत व्यक्त करण्याबरोबरच ॲड. सातेरी यांनी महापौर, नगरसेवकांचे अधिकार, अधिकाऱ्यांचे कार्य आदींबाबत सविस्तर मुद्दे मांडले.Ex corporator

त्याचप्रमाणे शहराच्या विकासात भाषिकवाद पक्षीय राजकारण आणले जाऊ नये असे सांगून त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची सूचना मांडली. या सूचनेला सर्वांनी अनुमोदन दिल्यानंतर माजी नगरसेवक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली.

अध्यक्ष : शिवाजी केदारी सुंठकर, उपाध्यक्ष : लतीफ खान पठाण, रमेश सोनटक्की, सरिता पाटील, शिवणगौडा एस. पाटील, सरचिटणीस : दीपक ईश्वर वाघेला, संयुक्त चिटणीस : संजीव रामचंद्र प्रभू, खजिनदार : किरण सायनाक, रेणू किल्लेकर, कार्यकारी समिती सदस्य : रमेश कुडची, नागेश सातेरी, मालोजीराव अष्टेकर, वंदना बेळगुंदकर, एन. बी. निरवाणी, विजय मोरे, नेताजी जाधव, धनराज गवळी, शीला अशोक देशपांडे, संयोगिता हलगेकर, सादिक इनामदार, यल्लाप्पा कुरबुर, रणजीत सी. पाटील, रतन मासेकर, अमर येळ्ळूरकर, महेश नाईक, सुधा भातकांडे, संजय शिंदे, युनूस मोमीन, रायमन वाझ, सुनील बाळेकुंद्री व जयश्री माळगी. बैठकीस बेळगाव महापालिकेचे बहुतांश माजी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.