बेळगाव लाईव्ह :दिवाळी केवळ एका दिवसांवर आल्याने बाजारपेठमध्ये चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.बुधवारी सकाळी जरी पाऊस पडला असला तरी खरेदीसाठी लोक बाजारात दाखल झाले होते.
दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहक गर्दी करत आहेत. कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी दुकानात गर्दी दिसून येत आहे. गणपत गल्ली, पांगूळ गल्ली, मेणसी गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड येथील दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.
रस्त्याशेजारी स्टॉल मांडून अनेक विक्रेते दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री करत आहेत. रांगोळी, रंग, रांगोळीचे छाप, उटणे, पणत्या आदी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. पणत्या, विविध विविध ग्राहकांचे दिवाळीत
आकारात उपलब्ध असून असते. यंदा बाजारात पणत्यांचे रंगांचे आकाशकंदील विविध प्रकार आले असून, फॅन्सी लक्ष वेधून घेत आहेत. पणत्यांची बाजारात चलती आहे.
पणत्यांना विशेष महत्त्व त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आकारातील कंदील, विद्युत माळा, कागदी फुलांच्या माळा विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. या माळा ४० पासून ३०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध
आहेत. कामगार वर्गाचा पाच तारखेला पगार झाला असून, त्यानंतर खरेदीला वेग येत आहे. दिवाळीत प्रामुख्याने खरेदी होते ती कपड्यांची त्यामुळे या काळात कपडे विक्रेत्यांचा त्यामुळे या काळात कपडे विक्रेत्यांचा सर्वाधिक व्यवसाय होतो. लहान
मुलांना तयार कपडे, महिलावर्ग साडी खरेदीसाठी दुकानात गर्दी करत आहेत. शनिवार व रविवार खरेदीसाठी गर्दी होऊन चांगला व्यवसाय होईल, असा विश्वास व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.
पोलिसांकडून खबरदारीची सूचना
भुरट्या चोरट्यापासून सावध राहण्याच्या सूचना पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात येत होत्या. मोबाईल, पैशाचे पाकीट, किमती ऐवज सांभाळून ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत होते.