बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराला अशोक दूडगुंटी यांच्या स्वरूपात कर्तव्यदक्ष महापालिका आयुक्त लाभलेत. तथापी त्यांच्यावर कुरघोड्या करणारेच जास्त झालेत. तेंव्हा राज्य सरकारने अशा कर्तव्यदक्ष आयुक्तांच्या पाठिशी खंबीर राहिल्यास बेळगावची सर्वसामान्य जनता धन्यवाद दिल्याशिवाय राहाणार नाहीत, असे मत शेतकरी नेते राजू मरवे यांनी व्यक्त केले आहे.
महापालिका आयुक्तांच्या बाबतीतील स्वतःला आलेल्या चांगल्या अनुभवाबद्दल बेळगाव लाईव्हला माहिती देताना मरवे म्हणाले की, आंम्हा शेतकऱ्यांचे काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होते. आम्ही उपजिल्हाधिकारी यानां निवेदन दिल्यानंतर तिथे आलल्या बेळगाव मनपा आयुक्तांची मी भेट घेतली.
तसेच रयत गल्लीतील सार्वजनिक कुपनलिकेला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे, ती दुरुस्ती करुन द्यावी अशी विनंती त्यांना केली. तेंव्हा त्यांनी तात्काळ एल अँड टी च्या संबधीत मुख्य कर्मचारीऱ्यांशी संपर्क साधून त्यांचा मोबाईल माझ्या हातात देऊन तुमची तक्रार त्यांना सांगा म्हणून सांगितले.
तक्रार सांगितल्यानंतर मी घरी पोहोचायच्या आत रयत गल्लीतील कुपनलिकेच्या ठिकाणी संबधीत अधिकारी व दुरुस्ती करणारे हजर होते. मी येईपर्यंत ते वाट पहात थांबले होते. त्यांना सर्व माहिती दिल्यानंतर त्या बोअरमध्ये गटार, ड्रेनेजचे पाणी येत आहे ते आधी बंद केल पाहिजे. त्यानंतर आंम्ही तात्काळ दुरुस्ती करुन देऊ म्हणून आपला संपर्क क्रमांक देऊन ते अधिकारी गेले असे सांगून आता गटारीचे काम करण्याची जबाबदारी नगरसेवकानां दिली आहे.
बघू ते किती दिवसात करतात. अन्यथा परत मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी साहेब आहेतच. सांगायचे तात्पर्य येवढेच कि आजपर्यंत मी एवढ्या मनपा आयुक्तांना भेटून समस्या मांडल्या, पण असा कर्तव्यदक्ष आयुक्त कधी पाहिला नाही, असे शेतकरी नेते मत राजू मरवे यांनी व्यक्त केले.