बेळगाव लाईव्ह : अनेक बैठका आणि चर्चे नंतर बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी कावळेवाडी गावच्या श्री महालक्ष्मी यात्रेचा मुहूर्त ठरला आहे.बिजगर्णी येथील श्री लक्ष्मी यात्रोत्सव 16 एप्रिल 2024 रोजी करण्यात येणार आहे नुकताच गावातील श्री ब्रह्मलिंग देवळात ग्रामस्थ मंडळाची बैठक संपन्न झाली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वसंत अष्टेकर उपस्थित होते.
सदर श्री लक्ष्मीची यात्रा दोन गावांची एकत्रितपणे होणार आहे बिजगर्णी, कावळेवाडी अशा तीन गावांचा यात समावेश आहे. यात्रेचा मुहूर्त ठरवण्यावरून मतभेद झाला होता अखेर ग्रामस्थांनी चर्चेतून वाद विवाद मिटवत यात्रा उत्साहाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिजगर्णी गावातील श्री ब्रह्मलिंग देवळात तीन गावांतील ग्रामस्थांनी बैठक घेऊन ही यात्रा 16 एप्रिल रोजी करण्याचे एकमताने ठराव संमत करून निश्चित केले आहे.
ही यात्रा तब्बल तीस वर्षांनंतर भरवली जात आहे त्यामुळे या गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
बिजगर्णी देवीची यात्रा भक्तांना पावणारी , मनोकामना पूर्ण करणारी देवता म्हणून श्रद्धाळू भक्त जनांच्या मनात कोरलेली आहे अशी भावना या भागातील भाविकांची आहे.
तीस वर्षांनी भरवण्यात येणारी ही यात्रा आनंद देणारी आहे.त्यामुळे सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सर्वानुमते यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.यात्रोत्सव व्यवस्थित यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी सुरू केली आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे.