बेळगाव लाईव्ह :एरोस्पेस कॉम्पोनंट्स तयार करण्यात आघाडीवर असलेल्या बेळगावच्या एक्वस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विमानांची निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या एअरबस कंपनीच्या ए320, ए330 निओ आणि ए350 या विमानांच्या कांही महत्त्वाच्या कॉम्पोनंट्स अर्थात घटकांच्या पुरवठ्याचे विस्तारित कालावधीचे कंत्राट प्राप्त झाले आहे.
सदर कंत्राट मिळणे म्हणजे परिवर्तनात्मक पुरस्कार प्राप्त झाल्यासारखे असून ही बाब फक्त एक्वस कंपनीच नव्हे तर भारतीय अवकाश उद्योग क्षेत्रासाठी देखील मैलांचा दगड ठरणारी आहे. मेकिंग इंडिया मोहिमे अंतर्गत जागतिक अवकाश उत्पादन निर्मिती क्षेत्रासह एअरबस खोलीकरणातील आपल्या देशाचे वाढते महत्त्व याचे हे उदाहरण आहे.
एक्वस प्रा. लि. कंपनीशी झालेल्या करारावर बेळगाव येथे स्ट्रॅटेजिक प्रोक्युअरमेंट डिटेल पार्टस एअरबस एरो स्ट्रक्चर्सचे प्रमुख गनर हनसेन, प्रोक्युअरमेंट ऑफिसर नील विट्ट आणि एरोस्पेस एक्वस अध्यक्ष मोहंमेड बौझीडी यांनी नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या. करारातील अटीनुसार एक्वस कंपनी ही एअरबस कंपनीच्या ए320, ए330 निओ आणि ए350 या विमानांचे पंखे, विमानाचा सांगाडा (फ्यूजलेज) आणि एअरबस कमान यासाठी आवश्यक डिटेल्ड पार्ट्सची निर्मिती करणार असून हा करार 10 वर्षासाठीचा आहे.
विमान निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या एअरबस कंपनीशी झालेल्या या ऐतिहासिक कराराद्वारे एक्वास कंपनीने जागतिक स्तरावर स्वतःसह बेळगाव शहराचा आणि देशाचा नावलौकिक आणखी वृद्धिंगत केला आहे. ‘एअरबसशी झालेला हा करार म्हणजे एक्वसच्या आजवरच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
विमानांची निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीसोबत दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार बनणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे अशी प्रतिक्रिया करारासंदर्भात बोलताना एक्वसचे चेअरमन व सीईओ अरविंद मिल्लीगेरी यांनी व्यक्त केली आहे.