बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अरिहंत हॉस्पिटलमध्ये नुकताच डॉ. विक्रांत मगदूम यांच्या नेतृत्त्वाखाली रोबोटिक पद्धतीने 64 वर्षीय वृद्धेवर गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे अरिहंत हॉस्पिटलने रुग्णसेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून यापुढेही ही यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहणार आहे.
यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केल्याबद्दल डॉ. विक्रांत मगदूम व सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता यापुढेही अरिहंत हॉस्पिटलमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असून याचा हाडांच्या समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना लाभ होणार आहे.
डॉ. विक्रांत मगदूम हे अरिहंत हॉस्पिटलशी करारबद्ध झाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बेळगावमध्ये एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आल्याची पहिलीच बाब आहे. डॉ. विक्रांत मगदूम यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. आरजू नुरानी, जीवन नार्वेकर यांनी यशस्वी शास्त्रक्रिया केली हॉस्पिटलचे चेअरमन सहकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस केली.
रुग्णांना एकाच छताखाली सर्व आरोग्यसेवा मिळाव्यात, या उद्देशाने आम्ही अरिहंत हॉस्पिटलची स्थापना केली आहे.
आता हॉस्पिटलमध्ये अनेक विभाग सुरू झाले असून नुकताच गुडघे प्रत्यारोपण ही रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आम्ही प्रत्येक रुग्णाला सर्वश्रेष्ठ आरोग्यसेवा पुरवत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे असे सांगून डॉ. एम . डी. दीक्षित यांनी रोबोटिक शस्त्रक्रिया केलेल्या सर्व डॉक्टर व सहकाऱ्यांचे कौतुक केले.