बेळगाव लाईव्ह:देशातील दोन विमान कंपन्यांना या हिवाळी मोसमातील वेळापत्रकासाठी दररोज 20 ते 22 विमान फेऱ्या सुरू करण्यास नागरिक उड्डाण महासंचलनालयाने (डीजीसीए) परवानगी दिली आहे.
त्यामुळे डीजीसीएच्या हिवाळी वेळापत्रकानुसार इंडिगो आणि स्टार एअरलाइन्स या कंपन्याकडून बेळगाव येथून 10 शहरांसाठी नॉन स्टॉप विमान सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
विमान सेवांचे यंदाचे हिवाळी वेळापत्रक आज रविवार 29 ऑक्टोबरपासून पुढील वर्षीच्या 30 मार्चपर्यंत अंमलात आणले जाणार आहे. विशेष म्हणजे डीजीसीएच्या हिवाळी वेळापत्रका दरम्यान कोणत्याही नव्या एअरलाइन्सची विमान सेवा कार्यरत असणार नाही.
उपरोक्त दोन कंपन्यांपैकी स्टार एअर साप्ताहिक आधारे जास्तीत जास्त म्हणजे दर आठवडा 72 ते 75 विमान फेऱ्या सुरू ठेवेल. त्याचप्रमाणे इंडिगो एअरलाइन्सच्या दर आठवडा 70 विमान फेऱ्या सुरू असतील.
या पद्धतीने हिवाळी वेळापत्रकात या दोन्ही एअरलाइन्स कंपन्यांच्या बेळगाव विमानतळावरून आठवड्याला 140 ते 150 विमान फेऱ्या सुरू असणार आहेत.
Routes :
Route | Airline | Aircraft Type |
Belagavi-Bengaluru | IndiGo | ATR |
Belagavi-Bengaluru | IndiGo | ATR |
Belagavi-Bengaluru | IndiGo | ATR |
Belagavi-New Delhi | IndiGo | A320 |
Belagavi-Hyderabad | IndiGo | ATR |
Belagavi-Mumbai | Star Air | E145/E175 |
Belagavi-Tirupati | Star Air | E145/E175 |
Belagavi-Jodhpur | Star Air | E145/E175 |
Belagavi-Jaipur | Star Air | E145/E175 |
Belagavi-Surat | Star Air | E145 |
Belagavi-Ahmedabad | Star Air | E145/E175 |
Belagavi-Nagpur | Star Air | E145 |