स्थानिक आमदाराने प्रस्ताव दिल्यास… महापालिकेचा विस्तार : नगरविकास मंत्री

0
4
Ud minister
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना नालायक म्हणणारे भाजपचे आमदार बसनगौडा पाटील हे किती योग्य आहेत माहिती आहेत. मुख्यमंत्र्यांशी बरोबरी करण्याची त्यांची लायकी आहे का हे आधी त्यांनी पाहावे अशी टीका नगर विकास मंत्री बैरती सुरेश यांनी शुक्रवारी बेळगावात केली.

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या लायकीचे आहेत का? सिद्धरामय्या यांनी लोकांसाठी योगदान दिले आहे. पाटील त्यांनी काय केले आहे हे सांगावे.

नगर परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिका यांच्या अखत्यारीत इंदिरा कॅन्टीनची पुनर्बांधणी केली जात आहे. मागील भाजप सरकारने इंदिरा कॅन्टीनचे नाव खराब करण्यासाठी योग्य व्यवस्थापन न करता ते बंद करण्यापर्यंत मजल मारली होती. राज्यातील संबंधित जिल्ह्याच्या आहारानुसार या कॅन्टीनमध्ये अल्पदरात लोकांना जेवण दिले जाणार  असून कोणत्याही परिस्थिती मध्ये ही योजना बंद करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

महानगरपालिकेचा विस्तार करण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. स्थानिक आमदाराने प्रस्ताव दिल्यास त्याचा आढावा घेतला जाईल, असे ते म्हणाले.Ud minister

आगामी दिवसात राज्यात पिण्याची पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत राज्यात 24 जिल्ह्यात बैठका घेतल्या आहेत केवळ सात जिल्हे बाकी होते त्यात बैठका घेऊ असे ते म्हणाले.

महापालिका प्रशासन मंत्री रहीम खान, आमदार आसिफ उर्फ राजू सेठ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.