बेळगाव लाईव्ह:बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या नावे तीन बनावट इंस्टाग्राम खाती तयार करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी सायबर गुन्हा शाखेच्या पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास जारी आहे.
सदर बनावट खात्याच्या बाबतीत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केले आहे.
अलीकडेच भामट्यांनी बेळगाव जिल्ह्यातील आणि बेंगलोर येथील अशा दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट फेसबुक खाते निर्माण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
त्यानंतर आता महापालिका आयुक्तांसारख्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावे बनावट इंस्टाग्राम खाते उघडून सायबर गुन्हेगारांनी आपल्याला सर्वच जण समान आहेत हेच जणू दाखवून दिले आहे.
अलीकडे बनावट अकाउंट उघडून अनेकांना फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत या अगोदर बेळगाव शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची ही फेसबुक मधून फेक प्रोफाईल उघडण्यात आली होती त्याद्वारे ओळखीच्या लोकांकडून पैसे देखील मागणी करण्यात येत होती.
अशी बनावट फेक अकाउंट काढून पैसे मागण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे त्यामुळे सोशल मीडिया हँडल करत असताना प्रत्येकाने जबाबदारीने वागून काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे बनले आहे.