Wednesday, January 29, 2025

/

बेळगाव हिंडलगा कारागृह उडवण्याची धमकी…!!

 belgaum

बेळगाव लाईव्ह -कधी मारामारी, बेकायदा वस्तूंचा बिनबोभाट वावर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी आदी प्रकरणांमुळे चर्चेत राहणारे हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृह आता चक्क बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

एका अज्ञात व्यक्तीने फोन करून बंगळूर येथून फोन करून हिंडलगा कारागृह उडवून देण्याची धमकी दिली. कारागृहाचे डीआयजीपी उत्तर विभाग टी. पी. शेष यांना हा फोन आला आणि त्यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आपण हिंडलगा कारागृहातील कर्मचार्‍यांचा ओळखीचा असल्याचा दावा करणार्‍या एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला असून, हिंडलगा कारागृहातील जगदीश गस्ती, एस.एम. गोटे या प्रमुख वॉडरचा तो ओळखीचा असल्याचे अज्ञाताने सांगितले. त्या व्यक्तीने शेष यांच्या सरकारी नंबरवर कॉल करून धमकी दिली.Capital one

 belgaum

फोन कॉलमध्ये अंडरवर्ल्ड गँगस्टर बन्नंंजे राजा याच्या नावाचाही उल्लेख होता. बन्नंजे राजा तुरुंगात असताना त्यांना मदत केल्याचे त्याने म्हटले आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून कारागृह प्रशासनाला संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर डीआयजीपी शेष यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञातावर कारवाई करण्याची तक्रार केली आहे.

विविध कारणाने नेहमी चर्चेत असणारे कारागृह आता चक्क बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याची धमकी आली असल्यामुळे पोलिस आणि कारागृह प्रशासनात चलबिचल सुरू झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.